⚡ ब्रेकिंग News

शिवस्मारकाच्या रखडलेल्या कामाविरोधात आटपाडीत २३ एप्रिलपासून धरणे आंदोलन

आटपाडी - अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाची घोषणा होऊन 14 वर्षे, केंद्र सरकारची मंजुरी मिळून 12 वर्षे झाली आणि पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही 10 वर्षे पूर्ण झाली. तरीही अद्याप स्मारकाचे काम सुरू न झाल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रलंबित प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथे अभियंता महेशकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या 23 एप्रिल पासून नगरपंचायतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी 'बेमुदत धरणे आंदोलन' करण्याचा इशारा दिला आहे. स्मारकाची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्षात काम का सुरू होत नाही? नेमक्या कोणत्या परवानग्या बाकी आहेत? की केवळ राजकीय हेतूने हे काम थांबवण्यात आले आहे? असे गंभीर प्रश्न श्री. पाटील यांनी उपस्थित केले आहेत. हे स्मारक केवळ एक वास्तू नसून संपूर्ण देशाच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे येत्या १ मे पर्यंत कोणत्याही परिस्थितीत स्मारकाचे काम सुरू व्हावे, ही मागणी केली आहे. अभियंता तथा सामाजिक कार्यकर्ते महेशकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 23 एप्रिलपासून हे आंदोलन संविधानिक मार्गाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होईल. जर सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि ठोस निर्णय घेतला नाही, तर या धरणे आंदोलनाचे रूपांतर 'बेमुदत उपोषणात' करण्यात येईल. "जोपर्यंत सरकार ठोस आश्वासन आणि कामाचे वेळापत्रक जाहीर करत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही," असा निर्धार यावेळी व्यक्त केला. स्मारकाच्या कामाला गती मिळावी आणि सरकारवर दबाव निर्माण व्हावा, यासाठी आटपाडी तालुक्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमींनी या आंदोलनात सहभागी व्हावे आणि पाठिंबा द्यावा, असे आवाहन अभियंता महेशकुमार पाटील व आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...