⚡ ब्रेकिंग News

आटपाडीच्या कन्येची स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी

आटपाडी ता. 9- श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाची अर्थशास्त्र विभागाची विद्यार्थिनी पायल रमेश विभूते (रा. बोंबेवाडी) हिने स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले. तिची करसहाय्यक पदासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे तिने पहिल्याच प्रयत्नात कर सहाय्यक तसेच महसूल सहाय्यक या दोन्ही पदांवर यश मिळवले आहे. पायल विभूते हिचे पदवीपर्यंतचे शिक्षण श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात पूर्ण केले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिने स्पर्धा परीक्षांची दिशा ठरवून अभ्यासास सुरुवात केली. गेली तीन वर्षे  नियोजनबद्ध पद्धतीने आणि कठोर परिश्रमपूर्वक तिने अभ्यास केला. ग्रामीण भागातील मर्यादित साधनसामग्री असूनही जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले
 यशाबद्दल आटपाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि सचिव हणमंत पवार यांनी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांच्याही हस्ते तिचा सत्कार केला. यावेळी डॉ. ऋतुजा कुलकर्णी, डॉ. हणमंत सावंत, प्रा. संताजी लोखंडे, डॉ. उत्तम मोटे, डॉ. सदाशिव मोरे, डॉ. मंगल मार्कड व धर्मराज विभुते यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                     

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...