आटपाडी ता. 10- राज्य शासनाने सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधीं, प्रशासन व लाभार्थी यांनी समन्वयाने काम करावे. शासनाच्या धोरणात्मक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान यशस्वी करावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
येथे महाराजास्व अभियानांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, जिल्हा परिषदेचे सभापती पृथ्वीराज पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, शितल बंडगर, गटवविकास अधिकारी अजिंक्य कुंभार आदी उपस्थित होते.
शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देऊन महसूल राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, "शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचवणे हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा उद्देश आहे. महसूल विभागाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. तुकडेबंदी कायद्यात बदल, घरकुल बांधकामासाठी 5 ब्रास मोफत वाळू, पाणंद रस्ते योजना असे निर्णय घेतले. त्या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. एकही लाभार्थी वंचित राहू नये."
आमदार सुहास बाबर म्हणाले, सामान्य नागरिकाचे प्रश्न सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आयोजित केले आहे.दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जावून शासकीय योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
प्रास्ताविकात शितल बंडगर यांनी केले.
यावेळी विविध विभागांच्या योजनांच्या लाभार्थींना महसूल राज्यमंत्री योगेश कदम व मान्यवरांच्या हस्ते लाभ वाटप करण्यात आले.
Post a Comment