सांगलीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत संघर्ष आणखी उफाळला आहे. महापालिका गटनेत्याच्या विरोधात संताप व्यक्त करत तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे दिले आहेत. अजित दादांच्या निधनानंतर धाक राहिला नाही, मनमानी कारभार केल्याचा गंभीर आरोप थेट शहर जिल्हाध्यक्षांनी केला आहे. त्याचबरोबर मैनुद्दीन बागवान यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. : संतप्त झालेल्या ३५ शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी....
सांगली महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत संघर्ष आणखी चिघळला आहे. पक्षाच्या प्रदेशकडून दिगंबर जाधव आणि स्नेहल सावंत यांचे नाव अधिकृत लेटरहेडवर आले असताना ऐनवेळी गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी जाधव यांचे नाव काढून अशोक मासाळ यांचे नाव घातले. या कारभारामुळे संतप्त झालेल्या ३५ शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष जगदाळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्त केले आहेत. पक्षाचा आदेश डावलून अधिकृत...
प्रदेशकडून दोन जणांची नावे आली. त्या पत्रावर असलेले एक नाव गट नेत्याने परस्पर बदलले. यामुळे पक्षाची बदनामी होईल असा मेसेज जाईल असे सांगितले. मात्र, अजितदादा पवार यांच्या निधनानंतर धाक राहिला नसल्यासारखे वागून त्यांनी मनमानी कारभार करून पक्षाचा आदेश डावलून अधिकृत नाव न घालता दुसरे नाव घालण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे गटनेते मैनुद्दीन बागवान यांची पदावरून हकालपट्टी करावी. याविरोधात पक्षात संतापाची लाट आहे. पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे दिले आहेत. याबाबत प्रदेश पातळीवर वरिष्ठ नेत्यांशी आम्ही चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया पद्माकर जगदाळे यांनी दिली आहे. प्रदेशकडून दोन जणांची नावे आली. त्या पत्रावर असलेले एक नाव गट नेत्याने परस्पर बदलले. यामुळे पक्षाची बदनामी होईल असा मेसेज जाईल असे सांगितले. मात्र, अजितदादा पवार यांच्या निधनानंतर धाक राहिला नसल्यासारखे वागून त्यांनी मनमानी कारभार करून पक्षाचा आदेश डावलून अधिकृत नाव न घालता दुसरे नाव घालण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे गटनेते मैनुद्दीन बागवान यांची पदावरून हकालपट्टी करावी. याविरोधात पक्षात संतापाची लाट आहे. पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे दिले आहेत. याबाबत प्रदेश पातळीवर वरिष्ठ नेत्यांशी आम्ही चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया पद्माकर जगदाळे यांनी दिली आहे. अशोक मासाळे यांच्या निवडीवर आक्षेप
ज्या अशोक मासाळे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली, त्यांच्यावरही जाधव यांनी निशाणा साधला. मासाळे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांकडे अर्ज केला होता. त्यांचा पक्षाशी कोणताही जुना किंवा थेट संबंध नाही. अशा व्यक्तीला संधी देऊन निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याची भावना जाधव यांनी व्यक्त केली आहे. मोठी आर्थिक उचल घेऊन आपले नाव कापले गेल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू असल्याचे सांगत, त्यांनी बागवान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
إرسال تعليق