⚡ ब्रेकिंग News

सातारा जिल्हा रुग्णालयाच्या शिपायास लाच घेताना अटक

सातारा : सोनोग्राफी सेंटर, गर्भपात केंद्र आणि कुटुंब नियोजन केंद्राच्या परवान्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या वतीने पन्नास हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पैसे घेताच तत्काळ अटक केली. आनंदा गोपाळ वाळवेकर (वय ५८, एसपीएस महाविद्यालयामागे, सोनगाव, ता. सातारा) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे.  या कारवाईमुळे सातारा जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. तक्रारदार यांचे भागीदारीमध्ये रुग्णालय असून, त्यामध्ये सोनोग्राफी सेंटर, सरकारमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र सुविधा सुरू करण्यासाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक सातारा यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्याच्या मंजुरीसाठी ते तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकाच्या दालनातील शिपाई आनंदा वाळवेकर यांना वारंवार भेटले होते. वाळवेकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे यांच्यासाठी ५० हजार रुपये लाच मागण्यात आल्याची तक्रार तक्रारदाराने ९ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्याकडे दाखल झाली होती.तक्रारीच्या संदर्भाने ९ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत सात टप्प्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या प्रकरणाची कसून पडताळणी केली. १७ एप्रिल रोजी निर्णायक पडताळणीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांचे शिपाई आनंदा वाळवेकर यांनी डॉ.करपे यांच्याकरिता तक्रारदारांकडून पंचांसमक्ष ५० हजार रुपये लाच घेतली. त्यानंतर तत्काळ सापळा पथकाने त्यांना अटक केली.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...