⚡ ब्रेकिंग News

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात 889 हरकती

सांगली : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात वाळवा तालुक्यातील 989 शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या आहेत. हा महामार्ग रद्द करण्याची मागणी सोमवारी वाळवा तालुका शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या प्रकल्पामुळे वाळवा तालुक्यातील 852 एकर सुपीक बागायती शेती बाधित होणार असून हजारो शेतकरी भूमिहीन व बेघर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी शेतकऱ्यांच्या हरकती स्वीकारल्या, शासनाकडे म्हणणे सादर करू, असे आश्वासन दिले. मसुचीवाडी, बोरगाव, जुनेखेड, नवेखेड, वाळवा, ईश्वरपूर, कामेरी, येडेनिपाणी, ईटकरे, येलूर, कुरळप आणि ऐतवडे खुर्द या गावांतील शेतकरी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकल्पामुळे कृष्णा व वारणा नदी परिसरातील पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. दोन नद्यांमधील पट्ट्यातून प्रस्तावित मार्ग जात असल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन अधिक धोक्यात येईल. या परिसरातील बहुतांश शेती बागायती स्वरूपाची आहे. अनेकांनी बँकांकडून कर्ज घेऊन नदी उपसा सिंचन योजना, पाईपलाइन, विहिरी आणि बोअरवेल उभारल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...