⚡ ब्रेकिंग News

नांगरेमळा जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट होणार

आटपाडी  :  येथील नांगरेमळा परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची अनेक दिवसांपासून असलेली दुरुस्तीची मागणी आता मार्गी लागली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या दुरुस्ती कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती पृथ्वीराज पाटील, पंचायत समिती सभापती दत्तात्रय पाटील तसेच दत्तात्रय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते.यावेळी बोलताना मान्यवरांनी शाळेच्या गुणवत्तेवर आणि भौतिक सुविधांच्या गरजेवर भर दिला. नांगरेमळा येथील शाळेचा कायापालट झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या शुभारंभ प्रसंगी नगरसेवक बाळासाहेब हजारे, नगरसेवक शरद पाटील, नगरसेवक सुभाष सातारकर, नगरसेवक सोमेश्वर भिंगे, युवासेना तालुका अध्यक्ष मनोज नांगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद नांगरे यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांगरेमळा परिसरातील ग्रामस्थांनी या विकासकामाचे स्वागत केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...