⚡ ब्रेकिंग News

बातमी : खासदार सुप्रिया सुळेंच्या कारचा अपघात, भरधाव वाहनाची धडक; गुजरात पासिंगचं वाहन

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा पुणे ते मुंबई प्रवासादरम्यान भीषण अपघात झाला. आज महामार्गावरून जात असताना एक वाहनचालक बेदरकार वाहन चालवत असल्याने त्याने सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धडक दिली. सुदैवाने यात काही दुर्दैवी घडलेलं नाहीय. सुप्रिया सुळेंची पोस्ट करत माहिती
याबाबत सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे. सुळे यांनी संबंधित गाडी चालकाचा नंबर देखील शेअर केला आहे. 'जीजे 13 सीएफ 5257 या क्रमांकाच्या वाहनाने निष्काळजीपणे आणि वेगात वाहन चालवत बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वजण सुरक्षित बचावले. सीट बेल्ट घातल्यामुळे मी बचावले असल्याचं', सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...