⚡ ब्रेकिंग News

सांगली जिल्हा बँकेवर दोन महिन्यात प्रशासकीय येणार : आमदार गोपीचंद पडळकर

सांगली:सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित भ्रष्टाचार आणि अनियंत्रित कारभारावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "बँकेच्या चौकशीसाठी दोन निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून, येत्या दोन महिन्यांत त्यांचा अहवाल प्राप्त होईल. हा अहवाल आल्यानंतर बँकेवर प्रशासक येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही," असा खळबळजनक दावा पडळकर यांनी रविवारी (११ मे) प्रसारमाध्यमांशी बोलताना केलानिवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीआमदार पडळकर म्हणाले की, बँकेत झालेला ८१ कोटी ८९ लाखांचा गैरव्यवहार आता लपून राहिलेला नाही. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सरकारने निवृत्त न्यायाधीश एम. आर. मखरे यांच्यासह दोन अनुभवी न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. या चौकशीमुळे बँकेच्या कारभारातील दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलबँकेने नियमबाह्य कर्जवाटप आणि नोकरभरतीत मोठा भ्रष्टाचार केला आहे. यापूर्वीच्या चौकशीत अनेक त्रुटी समोर आल्या होत्या, मात्र राजकीय दबावामुळे कारवाई रखडली होती. आता ही चौकशी अंतिम टप्प्यात असून दोन महिन्यात अहवाल सादर होईल. भ्रष्टाचार सिद्ध झाल्यावर विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती अटळ आहे," असेही त्यांनी ठामपणे सांगितले.यावेळी पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला. बँकेला आपली खासगी मालमत्ता समजणाऱ्यांच्या सत्तेला आता सुरुंग लागणार असून, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाचा हिशोब द्यावाच लागेल, असा इशारा त्यांनी दिला.या दाव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, जिल्हा बँकेच्या आगामी राजकारणावर याचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...