आटपाडी ता. 15 : बनपुरी विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत बुरुंगले तर उपाध्यक्षपदी नाना पावणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच १३ जागा जिंकून सोसायटीवर आपले एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक पार पडली. संपूर्ण तालुक्याचे या नलक्ष लागले होते.सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष महादेव पाटील आणि हणमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक मोठ्या बहुमताने जिंकली. यामध्ये आबा पुकळे, कृष्णाबाई रखमाजी ढवळे, आवडाबाई हरिबा यमगर, रज्जाक मुलाणी, भारत कांबळे, धोंडीराम पुकळे, लक्ष्मण काळे, विकास मंडले, सूर्यकांत बुरुंगले, नाना पावणे, कृष्णा यमगर, जालिंदर यमगर आणि दादा यमगर हे संचालक म्हणून विजयी झाले होते.नवनिर्वाचित अध्यक्षांची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निवडीनंतर आयोजित सत्कार समारंभात माजी उपाध्यक्ष महादेव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना महादेव पाटील यांनी, "नूतन पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी आणि सभासदांच्या प्रगतीसाठी आदर्शवत काम करावे," असे आवाहन केले.
बनपुरी विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत बुरुंगले यांची निवड
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment