⚡ ब्रेकिंग News

आटपाडीतील गोरडवस्तीवर आखरे पिण्याचे पाणी नळाद्वारे पोहोचले

आटपाडी : आटपाडी नगरपंचायत क्षेत्रातील नांगरेमळा येथील गोरडवस्ती वरील 14 कुटुंबांना अखेर नळाद्वारे पाणी मिळाले. त्याचे  नागरिकांनी पुजन करून आनंदउत्सव साजरा केला. नांगरेमळा येथून जवळच गोरडवस्ती आहे. तिथे 14 कुटुंबीय राहतात. या वस्ती पासून दिड किलोमीटर अंतरावर नगरपंचायतीची पाणीपुरवठा विहीर होते. वस्तीवरील नागरिक या विहिरीतील पाणी रस्सीने शेंदून पिण्यासाठी वापरत होते. पिण्याच्या पाण्यासाठी या कुटुंबियांना रोजची दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत होती.        नुकतीच विहीर ते वस्तीपर्यंत जलजीवन मधून पाणी योजनेच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले. नगरपंचायतीने या विहिरीवर विद्युत पंप बसवून नवीन पाईपलाईन मधून गोरड वस्तीवरील नागरिकांना पिण्यासाठी पाणी सोडले.  आता या भागात नियमित पाणीपुरवठा होणार आहे. या नवीन सुविधेमुळे पाण्यासाठी होणारी नागरिकांची, विशेषतः महिलांची मोठी गैरसोय आणि वणवण आता पूर्णपणे थांबली आहे. पाणी वस्तीवर पोहोचल्याने स्थानिक नागरिकांमधून आनंद व समाधान व्यक्त केले. ही पाणी योजना कार्यान्वित करताना नगराध्यक्ष उत्तम जाधव, आबासाहेब पाटील, चंदू काळे यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. हे काम मार्गी लावण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, नगराध्यक्ष उत्तम जाधव आणि चंदू काळे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे नगरसेवक पाटील यांनी सांगितले.                    फोटो: आटपाडी नगरपंचायत हद्दीतील गोरड वस्तीवरील पाणी योजना नगराध्यक्ष उत्तम जाधव यांच्या हस्ते कार्यान्वीत केली.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...