आटपाडी : माणदेशी संस्कृती आणि कलावंतांचा डंका संपूर्ण महाराष्ट्रात वाजवणाऱ्या 'फुला' चित्रपटानंतर, आता या मातीतील एक विस्मरणीय आणि थरारक इतिहास जगासमोर येणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या गोफणीच्या जोरावर इंग्रज सैन्याला जेरीस आणणाऱ्या 'बाजा आणि बैजा' या दोन नरवीरांच्या जीवनावर आधारित 'बाजा-बैजा' या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहेशौर्याचा अनन्यसाधारण इतिहासकुकुडवाड-मायणी परिसरातील बाजा आणि बैजा हे दोन वीर त्यांच्या अजोड गोफण नेमबाजीसाठी प्रसिद्ध होते. गोरगरीब शेतकरी आणि कष्टकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी बंड पुकारले होते. अत्यंत दुर्गम भागाचा आधार घेत त्यांनी बंदूकधारी इंग्रज सैनिकांशी लढा दिला आणि आपल्या गोफणीने कित्येकदा शत्रूची डोकी फोडली. जुलमी सावकारांना 'सळो की पळो' करून सोडणाऱ्या या नरवीरांचा साहसी प्रवास 'बोधी सिनेमा' या निर्मिती संस्थेअंतर्गत पडद्यावर जिवंत होणार आहेदिग्गज कलाकारांची मांदियाळीया चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक जावीर करत असून, संगीताची धुरा समाधान ऐवळे सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे, 'नीळकंठ मास्तर' फेम अभिनेता ओंकार गोवर्धन यात प्रमुख भूमिकेत दिसणार असून, अभिनेत्री अश्विनी कासार हिची देखील महत्त्वाची भूमिका असणार आहे. याशिवाय 'फुला' चित्रपटातील मंजुशी खेत्री, आरोही गडदे, सनी कदम आणि सृष्टी जाधव हे कलाकारही यात पाहायला मिळतील.अजय गोगावले यांच्या स्वरांचा साजचित्रपटातील गीतांना एक वेगळा बाज असणार असून, एक खास प्रेमगीत प्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या आवाजात रेकॉर्ड केले जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ऐतिहासिक कालखंडाचा अनुभव प्रेक्षकांना दिला जाईल.स्थानिक रोजगाराला चालनासप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात माणदेशातच या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडणार आहे. या चित्रपटामुळे माणदेशातील नवोदित कलाकारांना मोठी संधी उपलब्ध होणार असून, या भागातील संस्कृती आणि बोलीभाषेला जागतिक व्यासपीठ मिळणार आहे. चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून या भागात मोठी आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे.
माणदेशी पराक्री शौर्याचा जागतिक हुंकार! कुकुडवाडच्या 'बाजा-बैजा'ची वीरगाथा मोठ्या आत्ता पडद्यावर!, चित्रपट निर्मितीची घोषणा
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment