⚡ ब्रेकिंग News

सुपीक जमीन घेऊन आम्हाला भिकेला लावण्याचा डाव हाणून पाडणार

कुरळप : 'शक्तिपीठ महामार्गा''विरोधात आता ग्रामीण भागात राजकीय आणि सामाजिक उद्रेक सुरू झाला आहे. कुरळप (ता. वाळवा) येथील ७५ एकर सुपीक जमीन या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गात बाधित होत असल्याने, या निर्णयाविरोधात संपूर्ण गाव एकवटले आहे. मंगळवारी गावातील हनुमान मंदिरात सरपंच डॉ. मदन शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वादळी ग्रामसभेत, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे शासनाच्या भूसंपादनाला ग्रामपंचायतीने अधिकृतपणे ‘रेड सिग्नल’ दाखवला असून, हा लढा आता अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील महिनाभरापासून कुरळप शक्तिपीठ रद्द संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. समितीने दिलेल्या निवेदनाची दखल घेत सरपंच डॉ. मदन शेटे यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. या सभेला संपूर्ण गावाने गर्दी करत प्रशासनाला एकजुटीची ताकद दाखवून दिली. अध्यक्षीय भाषणात सरपंच डॉ. मदन शेटे यांनी शेतकऱ्यांना पूर्ण पाठबळ जाहीर केले

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...