जत :शिवसेना नेत्या तथा साध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड. विद्या मोटे यांनी जत तालुक्यात विविध विवाह सोहळे आणि मान्यवरांच्या घेतलेल्या सदिच्छा भेटींमुळे जतच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वाढत्या राजकीय सक्रियतेकडे 'भविष्यातील राजकीय पेरणी' म्हणून पाहिले जात असून, यामुळे तालुक्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेमाजी आमदार विलासराव जगतापांकडून मार्गदर्शनया दौऱ्यादरम्यान ॲड. विद्या मोटे यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत विलासराव जगताप यांनी मोटे यांना महत्त्वपूर्ण राजकीय मार्गदर्शन केल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी युवा नेते संग्राम जगताप हे देखील उपस्थित होतेसुरेश शिंदे यांच्या निवासस्थानी सत्कारसांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांच्या निवासस्थानीही त्यांनी भेट दिली. यावेळी शिंदे कुटुंबाच्या वतीने ॲड. विद्या मोटे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सुरेशराव शिंदे, स्वप्नील शिंदे, डॉ. निखिल शिंदे, नगरसेवक इम्रान गवंडी, प्रवीण गडदे, लक्ष्मण सिदरड्डी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.ॲड. विद्या मोटे यांच्या या लागोपाठच्या गाठीभेटींमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी जत तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू केल्याचे बोलले जात असून, राजकीय जाणकारांकडून या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
ॲड. विद्या मोटे यांच्या जत दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळळ; आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘राजकीय पेरणी’ सुरू
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment