आटपाडी -आटपाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे दत्तात्रय पाटील यांची तर उपसभापतीच्या सौ. कल्पना पुसावळे यांची बिनविरोध निवड पार पडली. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने पाच तर भाजपाचे तीन सदस्य निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेचे नूतन सदस्य दिलीप हेगडे त्यांच्या हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मित निधन झाल्याने त्यांची संख्या चार झाली होती. तरीही भाजपचे तीन आणि शिवसेनेचे चार सदस्य असल्याने शिवसेनेचेच बहुमत असल्याने शिवसेनेचा सभापती आणि उपसभापती होणार निश्चित होते. आज पंचायत समितीच्या सभागृहात सभापती आणि उपसभापती ची निवड प्रक्रिया पार पडली. निवडीला शिवसेनेचे चार आणि भाजपाचे तीन सदस्य उपस्थित होते. यावेळी सभापती पदासाठी करगणी गणाचे सदस्य दत्तात्रय पाटील यांनी तर उपसभापती पदासाठी दिघंची गणाच्या सदस्या कल्पना पुसावळे यांचे अर्ज दाखल झाले. तर भाजपकडून कोणाचाच उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निवडणूक प्रशासनाने दत्तात्रय पाटील आणि कल्पना पुसावळे यांची सभापती आणि उपसभापतीपदी निवड जाहीर केली. निवडीनंतर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, साध्य फाउंडेशनच्या अध्यक्ष विद्या मोटे यांनी विशेष सत्कार केला. यावेळी श्री. देशमुख आणि श्री. पाटील यांनी नूतन सदस्यांनी पंचायत समितीचा लोकाभिमुख कार्यभार करण्याची अपेक्षा व्यक्त केली. जवळपास तीन वर्षे प्रशासनामुळे पंचायत समितीच्या कामकाजात विस्कळीतपणा आला होता. नूतन पदाधिकाऱ्यांनी विस्कळीत कारभाराला शिस्त लावून प्रशासन गतिमान करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य विनायक मासाळ, जिल्हा परिषदेचे सदस्य पृथ्वीराज पाटील, पंचायत समितीच्या सदस्या डॉ. मीनाक्षी पाटील, लक्ष्मी सरगर, अमोल मोरे, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब होनराव, सुनील सरक, दादासाहेब सरगर, सत्यशिल सवने आदी उपस्थित होते.
आटपाडी पंचायत समितीच्या सभापतीपदावर दत्तात्रय पाटील
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment