⚡ ब्रेकिंग News

आटपाडी बाजार समितीचे वेअर हाऊस शेतकऱ्यांसाठी सज्ज

आटपाडी - आटपाडी बाजार समितीचे दिघंची येथे एक हजार मॅट्रिक टन क्षमता असलेल्या वेअर हाऊसचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी दिली. आटपाडी तालुक्यात गहू, मका, बाजरी, ज्वारी, मूग मटकी याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. जेव्हा शेतातून शेतकऱ्यांचा माल येतो तेव्हा त्या धान्याचे 100% दर कोसळलेले असतात, असा शेतकऱ्यांना नेहमीच अनुभव येतो. व्यापारी धान्याचे दर पाडून शेतकऱ्यांचे लुटण्याचा प्रयत्न करतात. शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी बाजार समितीने दिघंची येथील उपबाजार आवारात 1000 मॅट्रिक टन धान्य क्षमता असलेल्या वेर हाऊसचे काम सुरू केले होते. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येणाऱ्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना धान्य ठेवण्यासाठी ते उपलब्ध होणार आहे. धान्याचे दर पडल्यावर शेतकऱ्यांनी चिंता न करता या वेअर हाऊस मध्ये धान्य सुरक्षित ठेवून दर वाढल्यावर विक्री करता येणार आहे. त्यासाठी बाजार समितीने ठेवलेल्या धान्यावर 70 ते 80 टक्के कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचा व्याजदर जेमतेम 6% असणार आहे. कर्जाची परतफेड केल्यावर व्याजातील तीन टक्के परतावा शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अवघे तीन टक्के दरातच धान्यावर कर्ज उपलब्ध होणार आहे. वेअर हाऊस मधील धान्य ऊन वारा पाऊस आणि किडीपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बाजार समितीचे असणार आहे. ते फक्त शेतकऱ्यासाठीच उपलब्ध असणार असल्याची माहिती सभापती संतोष पुजारी यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...