⚡ ब्रेकिंग News

लेकाच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळेचे कार्यालय बांधले

आटपाडी :  माणूस जातो, पण त्याचे कार्य आणि आठवणी समाजसेवेच्या रूपाने सदैव जिवंत राहतात, याचा प्रत्यय कामथ (ता. आटपाडी) येथे आला. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या स्व. लक्ष्मण सरक यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी, त्यांच्या पत्नी आणि वडिलांनी आपल्या दातृत्वातून कामथ येथील जिल्हा परिषद शाळेला एक सुसज्ज प्रशासकीय कार्यालय बांधून दिले. त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा भावूक वातावरणात पार पडला. स्वर्गीय लक्ष्मण सरक मुंबई कोकण भवन मध्ये शासकीय नोकरीला होते. गेल्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मित निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 45 वर्षे होते. ऐन तारुण्यात त्यांचे निधन झाल्याने साऱ्याच कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. त्यांना समाजकार्याची मोठी आवड होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी केवळ कुटुंबापुरत्या मर्यादित न ठेवता, समाजाच्या आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडाव्यात, या उदात्त हेतूने सरक परिवाराने शाळेला कार्यालय बांधून देण्याचा संकल्प केला आणि तो तडीस नेहला. ज्या शाळेत लक्ष्मण सरक यांनी प्राथमिक शिक्षण घेतले त्याच शाळेला त्यांच्या नावाने कार्यालय कुटुंबीयांनी बांधून दिले. ही वास्तू केवळ वीट-मातीचे बांधकाम नसून, सरक परिवाराचे समाजाप्रती असलेले प्रेम आणि शिक्षणाबद्दलची तळमळ याचे जिवंत प्रतीक ठरली आहे. पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या सोहळ्याला परिसरातील अनेक राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सरक परिवाराच्या या निर्णयाचे कौतुक केले. नवीन कार्यालयामुळे शाळेला चांगला उपयोग होणार आहे. शाळेच्या आवारात उभारलेली ही वास्तू येणाऱ्या अनेक पिढ्यांना सरक परिवाराच्या दातृत्वाची आणि स्वर्गीय लक्ष्मण सरक यांच्या स्मृतींची आठवण करून देत राहील.
यावेळी स्वर्गीय लक्ष्मण देवबा सरक यांचे वडील, पत्नी, सरक परिवार, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...