⚡ ब्रेकिंग News

: श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या प्रा. मनीषा पुसावळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान


आटपाडी - येथील आटपाडी शिक्षण संस्थेच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील प्रा. सौ. मनीषा चंद्रकांत पुसावळे यांना शिवाजी विद्यापीठाने भूगोल विषयातील संशोधनावर पीएच.डी. पदवी प्रदान केली. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. प्रा. मनीषा पुसावळे यांनी "अ स्टडी ऑफ फिमेल एग्रीकल्चरल लेबर इन सांगली डिस्ट्रिक्ट: अ जिओग्राफिकल एनालिसिस" या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले. सांगली जिल्ह्यातील महिला शेतमजुरांच्या भौगोलिक आणि सामाजिक स्थितीचा सखोल अभ्यास त्यांनी या प्रबंधाच्या माध्यमातून मांडला आहे.
या संशोधनासाठी त्यांना दहिवडी कॉलेजचे डॉ. ए. जे. बरकडे आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल आटपाडी शिक्षण संस्थेचे अमरसिंह देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य सुभाष कारंडे, प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले, सचिव एच. यु. पवार, निरीक्षक प्रकाश नामदास, अशोक चौगुले, अरुण गायकवाड तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील एका महिला प्राध्यापिकेने मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...