⚡ ब्रेकिंग News

गोळी डोक्याला लागली, दाखवली छातीवर

 गोळी डोक्याला लागली, पण दाखवली छातीत...विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड केली.

रोहीत पवार यांनी आज पत्रकार परिषदेत अपघाताच्या अनुषंगाने अनेक गोष्टींचा उलगडा केला. ते म्हणाले,"आमची अपेक्षा होती की या अहवालात चुका होऊ नये. पण त्या झाल्या, यांनी बारामतीला जिल्हा करून टाकला. एआयबी किती गंभीर आहे यावरून ते दिसून येते असं म्हणत रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला होते, याआधी त्यांनी मुंबईसह दिल्लीत देखील पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे मांडले होते, अशातच दोन दिवसांपर्वी आलेल्या डीजीसीएच्या (DGCA)च्या अहवालाबाबत आज काही मुद्दे मांडण्यासाठी रोहित पवारांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना रोहित पवारांनी म्हटलं की, मी व्हीएसआर किंवा डीजीसीए यांच्या विरोधात नाही. व्हीएसआर, डीजीसीए आणि एरो या कंपन्यांना मी टार्गेट मी करत नाही, मात्र यांना कोणीतरी डीजीसीएच्या माध्यमातून वाचवत आहे हे आपल्याला दिसून येत आहे, रिपोर्टमध्ये म्हटले आहे की ते लेअर जेटचे विमान होते. हा पूर्व नियोजीत दौरा नव्हता आपण म्हटला होतं तेही मान्य करण्यात आले आहे. ॲाफिशियल ऐजच्या ३००० तास जास्त हे विमान चालले होते. आमची अपेक्षा होती की या अहवालात चुका होऊ नये. पण त्या झाल्या. यांनी बारामतीला जिल्हा करून टाकला. एएआयबी (AAIB) किती गंभीर आहे यावरून ते दिसून येते असं म्हणत रोहित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेलं, तर...
त्याचबरोबर रोहित पवारांनी विमान पडतानाच्या व्हिडीओचा स्क्रिनशॉट दाखवत, अहवालात मांडलेले मुद्दे सांगत सविस्तर माहिती देताना म्हटलं की, व्हिडिओ पाहिल्यावर विमान राईट बँक झालं नव्हतं. तर लेफ्टला पडलं होतं. हे दिसून येत आहे, पण रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली आहे. या रिपोर्टमध्ये बेसीक जी गोष्ट आहे, गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेलं, तर डोक्याला लागली की पोटात लागली, जर डोक्यात लागली असेल तर इथे(अहवालात) सांगण्यात आलंय की छातीत लागली, इथे बेसिक निरीक्षण(Observation)एआयबी या संस्थेचं चुकलंय असं आमचं मत आहे, असंही रोहित पवारांनी सांगितलं आहे.रिपोर्टमध्ये झाडं आहेत असं सांगितलंय, इथं कुठं झाडं आहेत, इथे झुडूप आहे, त्या झुडूपाला कुठेही विमान टचही झालेलं नाही, झाडाची आणि विमानाची उंची कुठेच मॅच होत नाही, आणि रिपोर्ट द्यायचा म्हणून दिली की झाडांवर जबाबादारी ढकलून द्यायची म्हणून असा केविलवाणा प्रयत्न एआयबीकडून झाला असं आपल्याला म्हणावं लागेल असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

AAIB च्या अहवालात इन्वेस्टिगेशन टीमच नाव देखील नाही
झाडांना धडकून विमान खाली पडल असं रिपोर्टमधे लिहील आहे. मुळात झुडुपला देखील विमान धडकलं नाही, AAIB च्या अहवालात इन्वेस्टिगेशन टीमच नाव देखील नाही. यापूर्वी २०२३ च्या मुंबई विमान अपघात प्रकरणात तपास अधिकाऱ्यांच नाव होतं. व्हिजिबलिटी कमी होती. आमचं म्हणणं आहे की अॅरोचा मनोज पवार याची चौकशी व्हायला पाहिजे, कारण त्याने व्हिजिबिलिटी ठीक असल्याची माहिती दिली होती. DGCA ने व्हीआयपी प्रवासासाठी त्यागी समिती नेमून अत्यंत कडक नियम बनवले होते, त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, व्हिजिबिलिटी नसेल तर विमान उड्डाण करायचं नाही. तरीदेखील विमानने उड्डाण केलं कसं?, असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...