आटपाडी (प्रतिनिधी) आटपाडी नगरपंचायत हद्दीतील मटण ,चिकन व मासे विक्रेत्यांची बैठक आटपाडी नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष यु टी जाधव सर यांचे अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली .
यावेळी सर्व मांस विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या . शिवाय आटपाडी गावाचे शहरीकरण होत असताना स्वच्छतेबरोबर सर्वांनी एकाच छताखाली आले तर गावाचं रुपडं सुद्धा बदलण्यास मदत होईल . त्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष यांनी केले .त्यास सकारात्मक प्रतिसाद सर्व व्यवसायिकांनी दिला .शिवाय आटपाडी येथे पंच परमेश्वराचे महत्व मोठे असल्याने यापूर्वी माजी सरपंच कै . रामभाऊ पाटील यांनी घेतलेला दर सोमवारी मांस विक्रीला सुट्टीचा निर्णय पुढे नेण्याचे एकमताने ठरले . नवीन मटण मार्केटमध्ये लाईट व पाणी व्यवस्था केली जाणार आहे .
सदर बैठकीस उपाध्यक्षा मीनाक्षीताई पाटील, गटनेते ऋषिकेश देशमुख,नगरसेविका मनिषा पाटील, राधिका दौंडे , संगम डोंबे उपस्थित होते .
मांस विक्रेत्यांच्यावतीने बॅलीस्टर मुलाणी, नाथकलंदर खाटीक, फिरोज खाटीक, सत्तार मुलाणी, इन्नुस खाटीक, झाकीर मुलाणी, रामकृष्ण देशमुख, फारुक मुलाणी, अंनिस खाटीक, रहिमान खाटीक, मोहीन खाटीक, असिफ खाटीक, अर्षद खाटीक, सद्दाम मुल्ला, आरमान मुलाणी, आदम मुलाणी, शाहरूख पठाण, रियाज मुलाणी, जब्बार मुलाणी, फैयाज इनामदार, शाहरूख शेख, शब्बीर मुलाणी, मैनुद्दीन मुलाणी, रमजान शेख, अरबाज शेख, कदीर मुल्ला, शंकर ऐवळे, संतोष ऐवळे, रविंद्र नांगरे, रफिक शेख, महंमद शेख , शहाबुद्दीन शेख आदी व्यावसायिक उपस्थित होते .
Post a Comment