⚡ ब्रेकिंग News

आटपाडीच्या चौंडेश्वरी पतसंस्थेला अडीच कोटीचा नफा

आटपाडी : येथील नामांकित चौंडेश्वरी पतसंस्थेला संपलेल्या आर्थिक वर्षा अखेर २.५७ कोटींचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष राहुल सपाटे यांनी दिली. 
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ठेवी, कर्जवाटप व व्यवसायात लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
येथील चौंडेश्वरी पतसंस्थेने संपलेल्या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा पत्रकारांशी बोलताना सादर केला. ते म्हणाले ," गतवर्षाच्या तुलनेत सर्वच घटकात लक्षणिय वाढ नोंदवली. मार्च २०२५ अखेर असलेल्या २९ कोटीच्या ठेवी यंदा मार्च अखेर ३९ कोटी ७५ लाख झाल्या आहेत. तसेच कर्जवाटप २२ कोटी १७ लाख रुपयावरून २९ कोटी ७८ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
गतवर्षी १४ कोटी ७ लाखाची गुंतवणूक यंदा १७ कोटी ८७ लाख रुपये केली आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय ६९ कोटी ५२ लाख झाला आहे. तसेच निव्वळ नफा देखील वाढला असून गत वर्षी ८५ लाख २० हजार रुपये असलेला नफा यंदा १ कोटी २ लाख रुपयांवर गेला. तर २ कोटी ५७ लाख ढोबळ नफा मिळाला आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत दौंडे, अध्यक्ष राहुल सपाटे, उपाध्यक्ष योगेश रणदिवे, सचिव बालक डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे. सर्व संचालक, कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार आणि पिग्मी एजंट यांच्या सहकार्यामुळेच संस्थेचा विकास वेगाने होत असल्याचे सांगितले.
संस्थेचे चेअरमन राहुल पारदर्शक कारभार, काटेकोर नियोजन आणि सभासदांचा विश्वास यामुळे ही प्रगती झाली. पुढील काळातही सभासदांना अधिक सुविधा देण्याचा नियोजन आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...