⚡ ब्रेकिंग News

आरोप सिद्ध करा राजीनामा देतो अन्यथा तुम्ही संन्यास घ्य,ा नगराध्यक्षाचे अनिल पाटलांना आव्हान

आटपाडी - कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात बंद वजन काट्याची बिले जोडल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करून सदर कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची कारवाई करणार असल्याचे नगराध्यक्ष यु.‌टी. जाधव यांनी समाज माध्यमांशी बोलतान सांगीतले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी काल नगरपंचायतीमध्ये कचरा व्यवस्थापनामध्ये गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष श्री. जाधव यांनी आज खुलासा करताना यांनी भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करावा मी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देतो, अन्यथा त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा असे आव्हान अनिल पाटील यांना दिले. ते म्हणाले,"केवळ नगरपंचायतीवर भाजपाची सत्ता आल्यामुळे विरोधकांचा पोटसूळ उठला आहे. ऐनकेन प्रकारे नगरपंचायतीची बदनामी करणे एवढेच काम विरोधकांचं चालला आहे. स्वच्छतेचा ठेका दिलेली कंपनी आरोप करणाऱ्या व्यक्तीनेच आणली होती. प्रशासन काळात जी बिले जोडली होती तीच बिले आमच्यासमोर आली. बंद असलेल्या वजन काट्याची पावती जोडली असल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाला आजच आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर या पुढची दिली जाणारी रक्कम देणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले,"ग्रामपंचायत असताना स्वच्छतेचे जे कर्मचारी होते त्यांना संबंधित कंपनी 9 हजार रुपये पगार देत होती. उर्वरित सात हजार रुपये नगरपालिका पूर्वी देत होती. ठेकेदाराने या कर्मचाऱ्यांचा पगार थांबवला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आम्ही नगरपंचायतीकडे तात्पुरती नेमणूक करून प्रती कर्मचारी सतरा हजार रुपये प्रमाणे पगार दिला. त्यांच्याकडून आम्ही स्वच्छतेचे काम करून घेतले त्याचा मोबदला देण्यात गैर काय असा सवाल त्यांनी केला. तसेच कचऱ्याची विलनीकरण केले जात नाही. आम्ही आल्यापासून कचरा विलीणीकरणासाठी म्हणून एकाही कर्मचाऱ्याला पगार दिलेला नाही. तसा आमच्यावर केलेला आरोप पूर्ण खोटा आणि निराधार आहे. पाच घंटा गाड्यांची आवश्यकता आहे. सध्या तीन घंटागाड्या आहेत. तेवढेच पैसे ठेकेदाराला देतोय.".

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...