आळंदी : येथील फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात “विश्वमंगल मराठी फाउंडेशन” चा सोहळा पार पडला. यालाविविध भागांतून देश-विदेशातून अनेक उद्योजक व प्रतिष्ठित मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सुभाष देशमुख (सोलापूर), वक्ते व ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी, उद्योजक संजय वायाळ (ईशवेद बायोटेक प्रा. लि.), डॉ. उदय भोसले (वैज्ञानिक, लंडन) आणि आप्पासाहेब कोंढारे (सुवर्ण व्यावसायिक उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे महापूजन करून करण्यात आली. त्यानंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या मंदिरापासून सभागृहापर्यंत दिंडी काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते. “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”च्या लोगो व वेबसाईटचे अनावरण केले.
प्रास्ताविकात आमदार सुभाष देशमुख यांनी फाउंडेशनची स्थापना करण्यामागील भुमिका स्पष्ट केली. मराठी भाषा, संस्कृती, शाळा आणि मराठी उद्योगांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी “विश्वमंगल मराठी फाउंडेशन” कार्यरत राहील तसेच “लोकल टू ग्लोबल” आणि “ग्लोबल टू लोकल” ही संकल्पना विशद करत उपस्थितांना फाउंडेशनच्या कार्यात सक्रिय सहभागाचे आवाहन केले. विवेक घळसासी यांनी लोकमंगल ते विश्वमंगल या गेल्या २८ वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाचा गौरव केला. परदेशातून आलेल्या मान्यवर उद्योजकाचा परिसंवाद पार पडला. पंढरपूर ते आळंदी अशी सायकलवारी करणाऱ्या सायकल्स क्लब, पंढरपूरच्या सायकलवीरांचा स्वागत-सन्मान केलां.भारूडकार कृष्णाई उळेकर यांनी सादर केलेला “बुरगुंड” हा समाजप्रबोधनात्मक भारूड विशेष आकर्षण ठरला
कार्यक्रमाचा समारोप भक्तिभावपूर्ण वातावरणात पसायदान गाऊन करण्यात आला. “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”च्या माध्यमातून मराठी भाषा, संस्कृती आणि सामाजिक विकासासाठी व्यापक स्तरावर कार्य होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
Post a Comment