कामेरी - येथे आज शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी अधिग्रहित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. 5 मे 2026 रोजी काढलेल्या शासकीय परिपत्रकाची कामेरी गावातील शेतकऱ्यांनी *होळी* करून निषेध नोंदविला. यावेळी कामेरी येथील *रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव, शक्तीपीठ विरोधी शेती बचाव संघर्ष समितीचे समन्वयक प्रा. अनिल पाटील, सरपंच रणजीत पाटील, उपसरपंच सुर्यकांत पाटील, आनंदराव पाटील, शौल जाधव, प्रविण कांबळे, रमेश पाटील* आदी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शक्तीपीठ महामार्गाच्या शासन परिपत्रकाची कामेरी येथे होळी, शेतकरी रस्त्यावर उतरले
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment