⚡ ब्रेकिंग News

छत्रपतींच्या स्मारकासाठी आटपाडीत पंधराव्या दिवशी आंदोलन सुरूच,,

आटपाडी ता. 7 : मुंबईतील समुद्रातील रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी येथे गेली पंधरा दिवस सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे खासदार विशाल पाटील आणि आमदार सुहास बाबर यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे आंदोलकासह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अभियंता महेशकुमार पाटील यांचे नगरपंचायती समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी गेली पंधरा दिवस बेमुदत आंदोलन सुरू आहे. मुंबई समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले होते. त्यानंतर गेली बारा वर्षे स्मारकाचे काम रखडले आहे. रखडलेल्या कामाची सुरुवात करावी या मागणीसाठी आटपाडीत पंधरा दिवसापासून 40° वर असलेल्या तापमानातही ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आटपाडी तालुका नाभिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, मराठा सेवा संघ, चौंडेश्वरी पतसंस्था आटपाडी विणकर सोसायटी आदी संघटना आणि संस्थानी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला आहे. याशिवाय रोज सामाजिक राजकीय क्षेत्रातील नागरिक नेते मंडळी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा देत आहेत. आंदोलनाला रोज पाठिंबा वाढतो आहे. दरम्यान, पंधरा दिवसापासून आंदोलन सुरू असूनही खासदार विशाल पाटील आणि आमदार सुहास बाबर आंदोलनाकडे फिरकले नाहीत. त्यावर आंदोलन महेशकुमार पाटील आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...