⚡ ब्रेकिंग News

आटपाडीत 'डॉल्बी'मुक्त उत्सवासाठी मराठा सेवा संघ आक्रमक

आटपाडी : आटपाडी शहरात सण-उत्सव आणि मिरवणुकांमध्ये होणाऱ्या डॉल्बीच्या अक्राळविक्राळ आवाजामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर अखिल भारतीय मराठा सेवा संघाने आक्रमक पवित्रा घेत, शहरात डॉल्बी साऊंड सिस्टमवर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली. या संदर्भात त्यांनी लेखी निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना दिले.      मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, शहरात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने वाजवल्या जाणाऱ्या डॉल्बी आणि उच्च क्षमतेच्या ध्वनीवर्धकांमुळे ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडली जात आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना बसत असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचे विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे अशा ध्वनी  क्षेपकावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. तसेच ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. सार्वजनिक शांतता राखण्यासाठी नगरपंचायतीने विशेष मोहीम राबवावी, अशीही मागणी केली आहे. यावेळी प्रा. विजय शिंदे, अशोक पाटील, बी.ए. पाटील पी.एन.कदम, अभिजीत देशमुख, सागर पाटील, किरण मिसाळ आदी उपस्थित होते. मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आणि आटपाडीतील अनेक त्रस्त नागरिक उपस्थित होते. "ध्वनी प्रदूषणामुळे लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशाराही यावेळी देण्यात आला. प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. आता आटपाडी शहर 'डॉल्बी'च्या आवाजातून मुक्त होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...