⚡ ब्रेकिंग News

खताची कृत्रिम टंचाई जाणवल्यास कृषी विभागाला जबाबदार धरणार: आमदार सुहास बाबर

आटपाडी  : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आमदार सुहास बाबर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आगामी पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची तयारी, खत-बियाणांचे नियोजन आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सुहास बाबर म्हणाले, "खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खतांचा कोणताही तुटवडा भासू नये, याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. जर कुठेही खतांची कृत्रिम टंचाई किंवा जादा दराने विक्री होत असल्याचे आढळले, तर संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल." कृषी विभागाच्या सर्व योजना शेवटच्या घटकातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर जाऊन काम करावे, अशा सुचना दिल्या. बदलत्या हवामानाचा विचार करून शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करावा. कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांकडे वळणे ही काळाची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले. या बैठकीला कृषी विभागाने शेतकऱ्यांना न बोलवता कृषी सहाय्य ग्रामसेवकांनी इतरांनाच बोलल्याबद्दल आमदार श्री. बाबर यांनी नाराजी व्यक्त. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती पृथ्वीराज पाटील, पंचायत समिती सभापती दत्तात्रय पाटील, बाजार सभापती संतोष पुजारी, तहसीलदार शितल बंडगर, शिवसेना तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, शिवसेना गटनेते अमरसिंह पाटील यांच्यासह दत्तात्रय पाटील, शरद पाटील, दत्तात्रय चव्हाण, संतोष लांडगे, सुभाष सातारकर, अमोल मोरे, रामदास सूर्यवंशी, मनोज नांगरे उपस्थित होते. फोटो -१) आटपाडी येथे खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आमदार सुहास बाबर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...