⚡ ब्रेकिंग News

रक्ताचा सडा! शेतजमिनीच्या जुन्या वादातून अंदाधुंद गोळीबार; एकाच कुटुंबातील ५ जणांसह ६ जणांची कोयत्याने गळे चिरून निर्घृण हत्या

उमदी / चडचण  : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील जत (उमदी) नजीक असलेल्या चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवार, २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास एक थरारक आणि अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शेतजमिनीच्या जुन्या वैमनस्यातून व मालमत्तेच्या वादातून विरोधी गटाने पूर्वनियोजित कट रचून एका कुटुंबावर अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने गळे चिरून ६ जणांची जागीच निर्घृण हत्या केली. या सामूहिक हत्याकांडामुळे संपूर्ण भिमातीर परिसर आणि सीमाभाग हादरून गेला असून गावात प्रचंड भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेमिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोविंदपूर गावातील निराळे कुटुंब आणि गुळगी (गोलगी) कुटुंब यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून शेतजमिनीवरून व मालमत्तेवरून तीव्र वाद सुरू होता. यापूर्वीही त्यांच्यात अनेकदा खटके उडाले होते. हाच प्रदीर्घ काळ चालत आलेला वाद आज अत्यंत हिंसक वळणावर पोहोचला. गुळगी कुटुंबातील सदस्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी घातक शस्त्रास्त्रांसह निराळे कुटुंबाला गाठले आणि त्यांच्यावर थेट गोळीबार सुरू केला. गोळ्या लागून कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने गळे चिरून त्यांचा जीव घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहेमृतांची नावे : या भीषण हल्ल्यात मृत झालेले ५ जण एकाच निराळे कुटुंबातील असून, १ जण त्यांचा सहकारी (कामगार) होता. मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत:१. रेवणसिद्धप्पा (चंदू) निराळे२. दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे३. शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे४. चंद्रशेखर (राहुल) निराळे५. समर्थ निराळे६. शब्बीर अत्तार (नादाफ) (निराळे कुटुंबाचे सहकारी)घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा, कडेकोट बंदोबस्त:घटनेची माहिती मिळताच विजयपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांच्यासह चडचण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तातडीने गोविंदपूर गावात दाखल झाला. पोलिसांनी सर्व ६ मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.घटनेनंतर गावामध्ये आणि सीमाभागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहेहल्लेखोरांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना:या प्रकरणी चडचण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी विशेष तपास पथके (Teams) रवाना केली आहेत. "जमीन वादातून गुळगी कुटुंबाने हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल," अशी माहिती पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली आहे. या घटनेमुळे सीमाभागातील गुन्हेगारी आणि रक्ताळलेल्या भिमातीराचा जुना इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...