⚡ ब्रेकिंग News

सांगली जिल्हाच खरी कर्मभूमी - हणमंत गुनाले

आटपाडी : सह्यायक अभियंता, कार्यकारी अभियंता, अशी शासनात अनेक जिल्ह्यात कामे केली, परंतु अधीक्षक अभियंता म्हणून सांगलीत आल्यावर जिल्ह्यातील अनेक पाणी योजनेवर काम करताना मुख्यअभियंता, कार्यकारी संचालक झालो.माझी जन्मभूमी लातूर जिल्हा असला तरी सांगली जिल्हा माझी कर्मभूमी आहे, असे उद्दगार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक हणमंत गुणाले यांनी काढले. 
येथील कलेश्वर मंदिरात श्रमिक मुक्ती दल व सोप्पेकॉम्ने सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. यावेळी बोलत होते. 
अध्यक्षस्थानी डॉ. भारत पाटणकर होते. यावेळी फुलाबाई हुबाले, कमल मेटकरी, व सुरवंता लेंगर यांच्या हस्ते सत्कार केला.
  हणमंत गुणाले म्हणाले," शासनात विविध ठिकाणी काम केले, त्यावेळी सांगलीत पाण्यासाठी मोठी आंदोलन होत होती,असे ऐकत होतो, परंतु सांगलीमध्ये आल्यावर डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलने विकासाला विरोध नसून विकासासाठी त्याग करणाऱ्या लोकांना न्याय मिळवून देणारी असल्याचे समजले. काम करताना अडचणी आल्या नाहीत, कारण आपल्या बरोबर संवाद साधून योग्य प्रकारे काम करता आले, टेम्बु, म्हैसाळ, ताकारी यांचे विस्तारीकरण करून वंचित असणारी गावे समाविष्ट करता आलीआता पाणी आले. त्याचा वापर काटेकोरपणे, योग्य, एकजुटीने करा. पाणी वापर संस्था केल्याशिवाय पाण्याचा हक्क मिळणार नाही, पाणीही मिळणार नाही, योग्य उत्पादन, दुग्धव्यवसाय, जास्तीत जास्त उत्पादन अशा प्रकारे आपण जागृतपणे करा. अपूर्ण राहिलेली प्रकल्पाची कामे एकोप्याने करा.
  डॉ. भारत पाटणकर म्हणाले,'आटपाडी तालुक्यातील प्रत्येक माणसाला १ हजार घनमीटर पाणी मिळाले आहे. आटपाडी तालुक्यात पाणी घेताना मिळाले नाही तर, नुकसान भरपाई घेण्याचा हक्क मिळवला आहे तो सध्या फक्त आटपाडी तालुक्यातच आहे. कारण पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून पाण्याचे मालक झाला आहात. 
 साहेबराव चवरे, के. जे. जॉय, सादिक खाटीक, व्ही. एन. देशमुख,विष्णूपंत पाटील यांची भाषणे झाली.
किरण लोहकरे यांनी प्रास्ताविक केले. आभार उमेश लेमटे यांनी मानले.
जनार्धन झिंबल, नाथा बाड, वाय. डी. सरक, शिवाजी बाबर, स्नेहल पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. 
यावेळी नेहा भडभडे, देशमुख दाजी, चंद्रकांत गायकवाड, जितेंद्र गिड्डे, राजाराम मरगळे, अमोल माने, अण्णा यमगर, सर्जेराव गुटूगडे, विजय पुकळे, नानासो माळी, वासुदेव लेंगरे, मधुकर लेंगरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...